प्रश्न:- भारतीय श्रम बाजारपेठ ची स्थिति काय आहे?
( ४ गुण)
उत्तर :- भारतीय श्रम बाजारपेठेची स्थिति –
१) असंगठित क्षेत्राचे वर्चस्व: भारतातील बहुतांश कामगार असंगठित क्षेत्रात कार्यरत आहेत, जसे की बांधकाम, शेती, रस्त्यावरील विक्रेते. यामुळे त्यांना निश्चित वेतन, सुरक्षा आणि विमा अशा सुविधा मिळत नाहीत. उदा. बांधकाम कामगार, रिक्षाचालक, घरकाम करणाऱ्या महिला.
२) कुशलतेचा अभाव: अनेक कामगारांकडे आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान किंवा आवश्यक कौशल्ये नसतात, त्यामुळे रोजगार मिळवताना अडचणी येतात. उदा. उच्च शिक्षण न मिळाल्याने तरुणांना IT क्षेत्रात संधी मिळणे कठीण जाते.
३) बेरोजगारीचे प्रमाण: शिक्षित बेरोजगारी वाढत आहे. अनेक तरुणांकडे पदवी असूनही नोकरी उपलब्ध नसते. उदा. इंजिनिअरिंग केलेले तरुण विविध स्पर्धा परीक्षा देत असूनही रोजगार मिळत नाही.
४) गिग इकॉनॉमीचा उदय: अलीकडच्या काळात गिग व पार्ट टाइम नोकऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे लवचिक कामाचे तास मिळतात पण स्थिरतेचा अभाव आहे. उदा. झोमॅटो, स्विग्गीचे डिलिव्हरी पार्टनर्स, ओला-उबेर चालक.
निष्कर्ष: भारतीय श्रम बाजारपेठ वेगाने बदलत आहे, पण अजूनही असुरक्षितता आणि कुशलतेचा अभाव हे मोठे प्रश्न आहेत. सरकार व खासगी क्षेत्राच्या संयुक्त प्रयत्नांनी या समस्यांवर उपाय होऊ शकतो.
प्रश्न :-श्रम बाजारपेठेचे विश्लेषण म्हणजे काय? (४गुण)
उत्तर:- श्रम बाजारपेठेचे विश्लेषण म्हणजे कामगारांची उपलब्धता, रोजगाराच्या संधी, वेतनाचे स्तर, कौशल्यांची मागणी आणि पुरवठा यांचा अभ्यास करणे होय. या विश्लेषणातून देशातील रोजगाराची स्थिती, बेरोजगारीचे प्रमाण, आणि कामगारांच्या अडचणी समजतात.
उदाहरणे:
१) बेरोजगारीचे विश्लेषण – जर विश्लेषणातून असे दिसले की पदवीधर तरुणांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण अधिक आहे, तर त्यावर उपाययोजना करता येतात. उदा. इंजिनीअरिंग पदवीधरांना त्यांच्या शाखेनुसार नोकऱ्या मिळत नाहीत.
२) वेतन विश्लेषण – काही क्षेत्रांमध्ये कामगारांना फारच कमी वेतन मिळते. उदा. बांधकाम मजूरांना १०-१२ तास काम करूनही फक्त ₹300-₹400 मिळतात.
३) कौशल्य तफावत – उद्योग क्षेत्राला विशिष्ट कौशल्य असलेले लोक हवे असतात, पण त्यांची उपलब्धता कमी असते. उदा. आयटी कंपन्यांना डेटा सायन्स तज्ञांची गरज असते, पण प्रशिक्षण घेतलेले लोक कमी आहेत.
४) गिग इकॉनॉमीचे विश्लेषण – झोमॅटो, स्विगी, ओला यासारख्या कंपन्यांमध्ये अल्पकालीन कामे मिळतात, पण त्यामध्ये सुरक्षितता आणि स्थिरता नसते. हे कामगार अनौपचारिक क्षेत्रात मोडतात.
निष्कर्ष:
श्रम बाजारपेठेचे विश्लेषण करून सरकार आणि उद्योग धोरण आखू शकतात, ज्यामुळे रोजगारनिर्मिती आणि कामगार कल्याण साधता येते.
No comments:
Post a Comment