प्रश्न - श्रम बाजारपेठ म्हणजे काय? श्रमाची गतिशीलता आणि उत्पादकता स्पष्ट करा.
(8 गुण)
उत्तर :-
श्रम बाजारपेठ (Labour Market) ही अशी जागा आहे जिथे कामगार (श्रमिक) आणि रोजगारदाते (नोकरी देणारे) एकमेकांशी व्यवहार करतात. कामगार आपली मेहनत, कौशल्ये आणि वेळ विकतात, तर रोजगारदाता त्यासाठी वेतन देतो.
उदाहरण: एका फॅक्टरीमध्ये नवीन कामगारांची गरज आहे. त्या ठिकाणी वेगवेगळ्या व्यक्ती नोकरीसाठी अर्ज करतात. रोजगारदाता त्यांच्यातील योग्य उमेदवाराची निवड करतो. ही प्रक्रिया म्हणजेच श्रम बाजारपेठ.
श्रमाची गतिशीलता (Labour Mobility):
श्रमाची गतिशीलता म्हणजे कामगार एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, एका व्यवसायातून दुसऱ्या व्यवसायात किंवा एका उद्योगातून दुसऱ्या उद्योगात जाणे. गतिशीलतेमुळे कामगारांना अधिक वेतन, चांगली कामाची जागा, व कौशल्यवाढीची संधी मिळते.
परंतु, यामुळे काहीवेळा मूळ गावात श्रमिकांची कमतरता निर्माण होते.
प्रकार:
अ) भौगोलिक गतिशीलता :- कामगार एका गावातून दुसऱ्या गावात कामासाठी जातो.
उदाहरण: १) शेतकरी उत्तर प्रदेशहून मुंबईला बांधकामाच्या कामासाठी स्थलांतर करतो.
२) ) IT क्षेत्रात: एक सॉफ्टवेअर इंजिनिअर बंगळुरूहून पुण्याला स्थलांतर करतो – ही भौगोलिक गतिशीलता आहे.
आ ) व्यावसायिक गतिशीलता: कामगार एक कौशल्य सोडून दुसरे कौशल्य शिकतो आणि त्या व्यवसायात प्रवेश करतो.
उदाहरण: १)एक कारागीर सिलाई शिकून टेलरिंग व्यवसाय सुरू करतो.
इ) श्रमाची उत्पादकता (Labour Productivity):
श्रमाची उत्पादकता म्हणजे एका कामगाराने दिलेल्या वेळेत किती उत्पादन केले किंवा किती काम केले.
उत्पादकता जास्त असेल तर उत्पादन जास्त आणि नफा जास्त होतो.उत्पादकता वाढवण्यासाठी प्रशिक्षण, नवीन तंत्रज्ञान व चांगले कामाचे वातावरण गरजेचे आहे.उत्पादकतेमुळे केवळ कामगाराला नव्हे तर कंपनीलाही अधिक नफा मिळतो.
उदाहरण: १)जर एका कारखान्यात एक कामगार ८ तासांत १० युनिट तयार करतो आणि दुसरा कामगार १५ युनिट तयार करतो, तर दुसऱ्या कामगाराची उत्पादकता जास्त आहे.
२) दोन कारखान्यांमध्ये जिथे रोबोटिक्स वापरतात तिथे उत्पादन जास्त असते – त्यामुळे ती जागा अधिक उत्पादक ठरते.
निष्कर्ष:
श्रम बाजारपेठ ही अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. श्रमाची गतिशीलता कामगारांना अधिक चांगल्या संधी मिळवून देते, तर उत्पादकता देशाच्या आर्थिक प्रगतीस चालना देते. सोबत ते देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावतात.
No comments:
Post a Comment